अंगणवाडी सेवकांच्या संपाला तालुक्यातील सरपंचांनी पाठिंबा द्यावा - श्रीमंत रामराजे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३१ - फलटण तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मागील वीस दिवसांहून अधिक काळापासून बेमुदत संपावर आहेत, मानधन वाढ व विविध मागण्या घेऊन अंगणवाडी सेविकांना सेविकांनी संप पुकारला आहे. या संपाला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या सरपंचांनी पाठिंबा देऊन सहकार्य करण्याचे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील सरपंचांना केले आहे.
दि. ७ डिसेंबर २०२३ पासून फलटण तालुक्यातील ४४१ सेविका व ३८७ मदतनीस बेमुदत संपावर आहेत. तालुक्यातील फक्त सहा अंगणवाड्या सुरू आहेत तर ४६७ अंगणवाड्या बंद आहेत. संपावर गेल्याने अंगणवाड्यांचे कामकाज पुर्णपणे ठप्प पडल्याने तेथे शिकणारी मुले शिक्षण व पोषण आहारापासून वंचित आहेत.
No comments