Breaking News

सरडे गावात दर रविवारी आठवडा बाजार सुरु

Weekly market starts every Sunday in Sarde village

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ - लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावाला चांगल्या बाजारपेठेची आवश्यकता असते, हिच गरज ओळखून सरडे गावात, दर रविवारी आठवडा बाजार सुरु केला असून, याचा फायदा सरडे पंचक्रोशीतील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन सरपंच सौ.राणी जाधव यांनी केले.

    सरडे ग्रामपंचायत च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धायगुडे वस्ती येथे आठवडा बाजार शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपसरपंच राजूभाई शेख, श्रीराम कारखान्याचे संचालक सुखदेव बेलदार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महादेव चव्हाण, माजी सरपंच व विद्यमान सदस्य दत्ता भोसले, रामदास शेंडगे, सोसायटीचे चेअरमन लालासाहेब खताळ, सत्यवान धायगुडे, सौ.मंदा करडे, पोलीस पाटील मनोज मोरे पाटील, सिध्दार्थ मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

    आपल्या गावात आठवडा बाजार असावा अशी सर्वांची इच्छा होती, गावातील गरजा गावात पूर्ण व्हायला पाहिजेत म्हणून ग्रामपंचायतीने गटतट, पक्ष न पाहता बाजार सुरू केला आहे. याचा फायदा सर्व ग्रामस्थांनी दर रविवारी घ्यावा असेही सरपंच सौ.जाधव यांनी सांगितले.

    आपल्या गावच्या नावलौकिकामध्ये या बाजारामुळे भर पडणार असून, विक्रेते व ग्रामस्थांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. तरुण वर्गाने बाजारात येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन सहकार्य केले पाहिजे असे मत रामदास शेंडगे यांनी व्यक्त केले.

    आठवडा बाजार ग्रामपंचायत ने सुरु केल्याने कामगार व शेतमजूरांचा पगार दर रविवारी करावा, बाजाराची शिस्त कायम ठेवली पाहिजे, आपले गावही इतर गावांच्या बाजाराप्रमाणे नावारुपाला आले पाहिजे, त्यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सुखदेव बेलदार यांनी सांगितले.

    बाजारात कायदा व सुव्यवस्था राखून इतर गावचे विक्रेते आपल्या गावात आले पाहिजेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, टवाळखोर व दंगामस्ती करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस पाटील मनोज मोरे सांगितले.

    उपस्थितांचे स्वागत व सुत्रसंचालन दत्ता भोसले यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते सत्यवान धायगुडे यांनी या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास सुभाष धायगुडे,संजय जाधव, तात्या धायगुडे, सचिन शेंडगे, महादेव विरकर, सचिन जाधव, रामा रिठे, विजय जाधव, भाऊसाहेब आडके, आबा घोलप, अनिल चव्हाण,दत्तात्रय लोखंडे, प्रविण शेंडगे,  मोहन शेंडगे, आण्णा डोंबाळे,  मारुती चव्हाण, शरद सिताराम भंडलकर, उमाजी पांडुरंग जाधव, उत्तम महादेव चव्हाण  ,बापूराव ज्ञानदेव वलेकर ,अविनाश आबाजी कवराडे,तात्याबा पांडुरंग शेंडगे ,हरिभाऊ नारायण वाघमोडे, प्रथेमेश काळूराम भोईटे , किरण शेंडगे ,सचिन शेंडगे, बाळासो सुरेश भंडलकर, सुनील बबन भंडलकर, लक्ष्मण अंतू भडलकर ,धनाजी रावबा भडलकर सचिन तानाजी जाधव भरत जाधव अरुण चव्हाण ,प्रकाश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments