Breaking News

मासिक गुन्हे आढावा बैठकीत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला ४ पुरस्कार

4 awards to Phaltan Rural Police Station in monthly crime review meeting

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   - पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांची गुन्हे बैठक आयोजित केली होती. सदर गुन्हे बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल या उपस्थित होत्या. सदर बैठकीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारामध्ये पारितोषिक दिले जाते. यामध्ये  फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यास ४ पारितोषिके  मिळाली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला सर्वात जास्त मालमत्ता हस्तगत केली म्हणून २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक  व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच २०२३ मध्ये सर्वोत्तम अजामीन पात्र वारंटची बजावणी बाबतची बक्षीस सुद्धा फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले. पोलीस ठाण्यातील मुद्देमाल निर्मितीचे पारितोषिक फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले. जानेवारी २०२४ मध्ये सर्वात जास्त मालमत्ता हस्तगत चे पारितोषिक फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले आहे.

    सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार नितीन चतुरे, पोलीस नाईक तात्या कदम, पोलीस अंमलदार अमोल जगदाळे, हनुमंत दडस, संजय देशमुख, उर्मिला पेंदाम, वैभव सूर्यवंशी, संजय अडसूळ, चालक पोलीस  हवालदार योगेश रणपिसे व मदने यांनी केली आहे. त्यांना संपूर्ण फलटण ग्रामीण ठाण्यातील  स्टाफचे सहकार्य लाभलेले आहे.

No comments