Breaking News

उद्यानकन्यांद्वारे चौधरवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

A tree plantation program was completed at Chaudharwadi by Udyakanyas

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या आठव्या सत्रातील उद्यानकन्यांद्वारे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत १४ फेब्रुवारी २०२४ रोजी  क्रांतिज्योती क्रिडामंडळ मैदानाजवळ ,चौधरवाडी येथे  वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

    यावेळी चौधरवाडी गावचे सरपंच श्री.तुकाराम कोकाटे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.क्रांतिज्योती क्रिडामंडळ मैदानाच्या सभोवताली वेगवेगळ्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये कदंब,गोकुळ व इतर झाडांचा समावेश केला गेला. तसेच यावेळी उद्यानकन्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. 

    हा कार्यक्रम श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी , प्रा. जे. व्ही. लेंभे व प्रा.ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या भोईटे पायल,देशपांडे सई ,गोळे विभूती,जाधव साक्षी,लाळगे श्वेता, नाळे निकिता यांनी यशस्वीरीत्या पार पाडला.

No comments