सचिन जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - : महाराष्ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक सासकल ता. फलटण जि.सातारा यांना महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
सचिन जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर फलटण कृषि विभाग व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments