अनुप शहा यांची भाजपच्या फलटण शहराध्यक्ष निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - भारतीय जनता पार्टी फलटण शहरच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक अनुप शहा यांची निवड करण्यात आली. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे विश्वासू व फलटण नगरपालिकेतील अभ्यासू नेतृत्व म्हणून माजी नगरसेवक अनुप यांच्याकडे पाहिले जाते. गेले पंधरा वर्षे नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते तसेच भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून प्रदेश कार्यकारणी मध्ये काम करण्याचा अनुभव शहा यांना आहे.
अनुप शहा यांना असलेला प्रशासकीय अनुभव व नगरपालिकेतील अभ्यास याचा येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला निश्चितच फायदा होईल, असे मत खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी नियुक्ती वेळी व्यक्त केले. श्री अनुप शहा यांची भारतीय जनता पार्टी फलटण शहर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा संपर्क कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
No comments