Breaking News

काळज मध्ये राष्ट्रवादीच्या माजी उपसरपंच व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Entry of NCP's former deputy sarpanch and activists into BJP in Kaalj

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - काळज ता. फलटण गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपसरपंच सचिन गाढवे पाटील, डॉ. रामभाऊ माने व त्यांच्या सहकाऱ्यांचा  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला.

    यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी सुरू झाली असून, या तालुक्याच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पाणी नोकरी , रस्ते , पायाभूत सुविधा यासाठी निधी उपलब्ध करून आणला आहे . फलटण हे राज्यामध्ये विकासाचे मॉडेल म्हणुन बधितले जाईल. आज राष्ट्रवादी व इतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून भाजप मध्ये काळजचे माजी उपसरपंच सचिन गाढवे पाटील, डॉ. रामभाऊ माने, संपत गाढवे, विठ्ठल गाढवे, नाना साळुंखे, विजय गाढवे, गोरख गाढवे, नबाजी गाढवे सोमा चोपडे व इतर असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह  यांनी केले

 यावेळी युवा नेते धनंजयदादा साळुंखे पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, गटनेते अशोकराव जाधव, सिराजभाई शेख , राजेंद्र काकडे , वसीम इनामदार, प्रवीण काटकर, हरि गोपणर, विशाल नलवडे,लतीफभाई तांबोळी समीर धुमाळ, राहुल शहा , पिंटू शिंदे नंदू गाढवे, दादासो माने , नवनाथ गाढवे पाटील, डॉ. गोरख गाढवे, शामराव गाढवे, सोमनाथ गाढवे, सागर घाडगे, निलेश शिंदे, धनाजी सरक संजीव झणझणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments