Breaking News

पिंपरद येथे गांजा तस्करी ; ६ लाख ४१ रुपयांचा गांजा जप्त

Ganja smuggling at Pimpard; Ganja worth Rs 6 lakh 41 seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - फलटण ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरद गावचे हद्दीत गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून ६,४१,५००/- रुपये किंमतीचा २५.६६० किलो ग्रॅम गांजा व ६३,०००/- रुपये किंमतीची मोटार सायकल व २ मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा फलटण ग्रामिण पोलीस ठाणे यांना यश आले आहे.

    श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणाऱ्या इसमांच्या विरुध्द कारवाया करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सातारा जिल्हयातील अंमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

    दि.०७/०२/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पिंपरद ता. फलटण जि. सातारा गावचे हद्दीतील गगणगिरी मंगल कार्यालयाचे समोर तीन इसम मोटार सायकल क्रमांक एम.एच.११ बी.डब्ल्यू ५२९८ वरुन अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरीता येणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांना पथकासह नमुद ठिकाणी जावून प्राप्त माहितीमधील इसमांना ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. नमुद पथकाने प्राप्त माहितीच्या ठिकाणी फलटण ग्रामिण पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सापळा लावून तीन इसमांना ताब्यात घेतले. नमुद इसमांच्या कब्ज्ञातून एकूण ६,४१,५००/- रुपये किमतीचा २५.६६० किलो ग्रॅम गांजा व ६३,०००/- रुपये किमतीची मोटार सायकल व मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करुन त्यांचेविरुध्द फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गु.र.नं. १५०/२०२४ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

    श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, रविंद्र फाणें, विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, सनी आवटे, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अजित कर्णे, मनोज जाधव, अमित झेंडे, हसन तडवी, केतन शिंदे, धीरज महाडीक, अनिल खटावकर, अमोल निकम, दत्ता चव्हाण, अमृत कर्पे तसेच फलटण ग्रामिण पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार शांतीलाल ओंबासे, श्रीकांत खरात, सुरज काकडे, नितीन चतुरे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

No comments