Breaking News

धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून हॉकी खेळाडू अक्षता ढेकळे च्या कामगिरीचा सन्मान

अक्षता ढेकळे हिचा सन्मान करताना धैर्यशील मोहिते पाटील समवेत रामभाऊ ढेकळे, विशाल पवार  
Honoring the performance of hockey player Akshata Dhekle by the Dhairyasheel Mohite Patil

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ -  आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू अक्षता ढेकळे हिने ओमान देशात झालेल्या एफआयएच हॉकी ५ महिला वर्ल्डकप स्पर्धेमध्ये, उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारतीय हॉकी महिला संघाला वर्ल्ड कप २०२४ मध्ये रजत पदक मिळवून दिले. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते - पाटील यांनी वाखरी ता. फलटण येथे येऊन, अक्षताची भेट घेतली, तिचा सन्मान केला व शाबासकीची थाप पाठीवर टाकत, शासकीय स्तरावर मदत देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे,  सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार उपस्थित होते.

    आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणारी खेळाडू ही फलटण तालुक्यामधील असल्याचे समजताच, धैर्यशील मोहिते पाटील यांनी वाखरी, ता.फलटण येथे येऊन तिची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तिच्या कामगिरीचे कौतुक केले. तिला शासकीय स्तरावर आर्थिक मदत व शासकीय सेवेत रुजू करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन देऊन अक्षता हिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    अक्षताने ओमान, साऊथ अमेरिका, बेल्जियम, साऊथ अफ्रिका, भारत, नेदरलँड आणि स्पेन या ठिकाणी देशाचे प्रतिनिधीत्त्व करून.आत्तापर्यंत ८ वेळा भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत.

No comments