Breaking News

बारामती येथे लॉजवर नेऊन पतीने केला पत्नीचा खून

Husband killed his wife by taking her to a lodge in Baramati

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ - पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन,   जीवे ठार मारण्याचे उद्देशाने पत्नीला बारामती येथील लॉजवर नेऊन, पतीने हत्याराने पत्नीचा खून केला असून, घटनास्थळावर मयत महिलेच्या शरीरापासून  हात तोडून टाकलेला होता.

    याबाबत अधिक माहिती अशी, मयत महिला हिचे वडील महादेव धोंडिबा सोनवणे रा.सोनवडी ता. दौंड  यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी रेखा हीचा विवाह १८ वर्षांपूर्वी, बहिणीचा मुलगा विनोद गणेश भोसले रा.बी विंग रुम नं. २ माळसाईकृपा आप्पा शास्त्रीनगर कोपर रस्ता, डोंबिवली याच्याशी झाला होता, त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर मुलगी रेखा ही डोंबिवली येथे कामास होती परंतु जावई विनोद हा रेखाच्या  चारीत्र्यावर संशय घेवुन तीला त्रास देत होता, मारहान करीत होता व त्या संशयापोटी त्याने मुलगी रेखा हीला तिचे काम सोडायला लावले होते. 

    त्यानंतरही जावई विनोद हे मुलीला तीचे चारीत्र्यावर संशय घेवुन दारु पिवुन मारहान करीत होते. त्यामुळे आम्ही मुलीला आमचे घरी आणले, नंतर तीला तीचा नवरा नांदवणार नाही म्हणुन आम्ही, तीने तीच्या पायावर उभे रहावे म्हणुन तीला माळेगाव येथे नर्सिंग कोर्स साठी  अॅडमिशन करुन दिले. तरीपण विनोद हा तीला फोन करुन तुला मारुनच टाकतो तुला संपवतो तु बाहेरच सोकावली आहे असे म्हणुन तीला फोन करुन त्रास देत होता असे मुलगी आम्हाला सांगत होती.

    दि. ४/२/२०२४ रोजी रेखाचा नवरा विनोद याने रेखाला बारामती येथील गंगासागर लॉजमध्ये मारुन टाकले आहे असा आम्हाला फोन आला. आम्ही बारामती येथे आलो व हॉटेल गंगासागर येथे गेलो, लॉजमध्ये जावुन पाहिले तर माझी मुलगी रेखा ही लॉजचे रुम नं. २०७ मध्ये बेडवर मयत अवस्थेत पडली होती, तीचा उजवा हात कोणत्यातरी हत्याराने तोडुन  तेथे टाकलेला होता. लॉजच्या सीसी टीव्ही फुटेज मध्ये  जावई विनोद व मुलगी रेखा दोघे दुपारी आल्याचे दिसत होते. माझी मुलगी रेखा विनोद भोसले हीला विनोद गणेश भोसले याने चारीत्र्याचे संशयाचे कारणावरुन तिला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने, लॉजवर नेवुन तीचा कशानेतरी खुन केला असल्याची फिर्याद मयत महिलेच्या वडिलांनी दिली आहे.

No comments