Breaking News

फलटण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे रविवारी उद्घाटन

Inauguration of District and Additional Sessions Court at Phaltan on Sunday

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ -फलटण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. प्रकाश नाईक यांच्या हस्ते आणि सातारा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. विनायक रा. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होत आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय फलटण येथील अधिकार गृह येथे सुरू होत असून,  उद्घाटन सोहळा याच ठिकाणी पार पडणार आहे.

    या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा व अतिरित सत्र न्यायाधीश, फलटण (जि. सातारा) श्री. प्रवीण चतुर व फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अजित चाँद पठाण यांनी केले आहे.

No comments