महाराष्ट्र शायनिंग प्रदर्शनाचे उद्घाटन थाटात, मात्र नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे प्रदर्शन घाट्यात
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ फेब्रुवारी - फलटण येथे भरवण्यात आलेले महाराष्ट्र शायनिंग प्रदर्शनाचे उद्घाटन थाटात झाले मात्र आयोजकांच्या कारभारामुळे जनतेने या चांगल्या प्रदर्शनाकडे पाठ फिरवली आहे, प्रदर्शनावर मोठा खर्च करण्यात आला, मात्र त्याप्रमाणात नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद अल्प आहे, त्यामुळेच महाराष्ट्र शायनिंग प्रदर्शनाचे उद्घाटन थाटात झाले मात्र प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद घाट्यात गेल्याची चर्चा सुरू आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजना व खात्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्याच्या उद्देशाने दिल्ली येथील सांसा फाउंडेशनच्यावतीने फलटण येथील शुभारंभ लॉन्स येथे महाराष्ट्र शायनिंग प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये शासकीय योजनांची माहिती, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, जलसंधारण, पर्यावरण, आरोग्य, संरक्षण, भूगर्भशास्त्र, दूरसंचार, पर्यटन आदी स्टॉलचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आयोजकांनी फलटण शहर व तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करून त्यांना खाजगी बसेसची सोय करून, प्रदर्शनाच्या तिथे गर्दी करण्याचा प्रयत्न करावा लागला.
सांसा फाउंडेशन नियोजन करण्यात कमी पडल्याने या शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शनाबाबत सर्व सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहचली नसल्याने केंद्र सरकारचे विविध उपक्रम सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यात फाउंडेशन कमी पडल्याचे दिसत आहे.
No comments