मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून फडतरवाडी येथे महाआरती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - राज्य शासनाने सगेसोयरे अद्यादेश काढावा यासाठी उपोषणाला बसलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत ठीक राहावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा फडतरवाडी ता.फलटण या शाखेच्या वतीने जोतिबा मंदिरात महाआरती घेऊन त्यांचे आरोग्य चांगले राहून त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी जोतिबा चरणी प्रार्थना केली. यावेळी फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व फडतरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच जोपर्यंत आमरण उपोषण सुरू आहे तो पर्यंत दररोज ही आरती सुरू राहणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक दिवस मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा आमरण उपोषण केले होते, दरम्यान त्या नंतर वाशी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातिल इतर सहकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते की ९ फेब्रुवारी पर्यंत तसा अध्यादेश पारित करू मात्र अद्याप राज्य सरकारने अधिवेशन बोलावले नसून त्या ठरलेल्या वेळात मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून, ते पाणी सुद्धा पित नसल्याने त्यांची तब्बेत ढासळत चालली असून त्यांना काही झालेस महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठेल हे मुख्यमंत्री व राज्य सरकारने लक्षात घ्यावे,व ताबडतोब अधिवेशन बोलाऊन अध्यादेश पारित करून तसा कायदा करावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या वतीने केली असून या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ही आरती करण्यात आली आहे.
No comments