Breaking News

मराठा आरक्षण : फलटण तालुक्यात मराठा समाजाकडून ११ ठिकाणी रास्ता रोको

Maratha reservation: In Phaltan taluka, Maratha communityRasta Roko at 11 places

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार, आज मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने तालुक्यातील ११ ठिकाणी रास्ता रोको करीत, राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवार्गातून आरक्षण देण्याची मागणी केली, दरम्यान या रास्ता रोकोने तब्बल चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या नंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, व कारवाईनंतर सोडून देण्यात आले.

     आज शनिवार दि.२४ रोजी फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील चिंचबन येथे पुसेगाव व सातारा तसेच बाह्य मार्ग असलेल्या पुणे कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती, तसेच बारामती मार्गावर सांगवी पूल येथे सांगवी, सोमंथळी, अलगुडेवाडी, सोनगाव, सस्तेवाडी येथील बांधवानी रास्ता रोको करीत बारामती मार्ग ठप्प केला होता. खुंटे येथील नवीन पूलावर खुंटे, शिंदेवाडी, चौधरवाडी,  गारपिरवाडी, येथील बांधवानी मार्ग रोखून धरला. होळ येथील मार्गावर  होळ,जिंती, फडतरवाडी, भिलकटी,येथील बांधवानी मार्ग रोखीत एक मराठा कोटी मराठा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फलटण लोणंद मार्गावर बडेखान येथे सुरवडी, साखरवाडी, काळज,निंभोरे, वडजल,  काशीदवाडी, ढवळेवाडी, संगमनगर (नांदल) येथील तरुणांनी मार्ग रोखला. दरम्यान हा मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, सातारा व पुणे या मार्गावर निरा पूल/जुना टोलनाका येथे लोणंद, पाडेगाव, तरडगाव, सालपे, तांबवे,चव्हाणवाडी,येथील मराठा बांधवानी रास्ता रोको केला. त्या मुळे तब्बल दोन किलोमीटर वरती वाहने उभी असल्याने लोणंद पोलिसांनी रास्ता रोको आंदोलकांना ताब्यात घेतले,व पोलीस ठाण्यात नेले,  त्या नंतर कारवाई करून सोडून देण्यात आले.

     फलटण आसू रस्त्यावर राजाळे येथे राजाळे, साठे फाटा, मठाचीवाडी, सरडे, धुळदेव येथील मराठा समाजाने मार्ग रोखून धरला होता, तसेच गोखळी पाटी येथे बारामती तसेच इंदापूर कडे जाणारा मार्ग ढवळेवाडी, पवारवाडी, तामखडा, हणमंतवाडी,गुणवरे मुंजवडी, शिंदेनगर, जाधववाडी(आसू) या बांधवानी रोखून धरीत आरक्षणाची मागणी केली. फलटण शिखर शिंगणापूर मार्गावर सोनवडी बु येथे नाईकबोमवाडी, तिरकवाडी, मिरढे, जावली, कोळकी, येथील मराठा बांधवानी मार्ग रोखला होता, फलटण दहिवडी रस्त्यावर झिरपवाडी येथे भाडळी, निरगुडी, गिरवी, धुमाळवाडी,  बोडकेवाडी, जाधववाडा,सासकल येथील मराठा समाजातील बांधवानी रास्ता रोको केला,फलटण पंढरपूर मार्गावर वाजेगाव निंबळक येथे  निंबळक,पिंप्रद, टाकळवाडे, विडणी, माझेरी, राजुरी,बरड, बागेवाडी, शेरेशिंदेवाडी,कुरवली बु या गावातील समाज बांधवांनी मार्ग रोखून धरला यावेळी प्रत्येक ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या वतीने एक एक समनवयक यांनी सर्वांना एकत्र करीत हा रास्ता रोको यशस्वी केला, आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत हा रास्ता रोको पार पडला. यावेळी हजारो मराठा बांधव या रास्ता रोकोत सहभागी झाले होते.

No comments