मराठा आरक्षण : फलटण बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - १५ फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटल यांनी केली होती व यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये, शहरामध्ये सकल मराठा समाजाकडून १४ फेब्रुवारी २०२४ ला महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास फलटण शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी, लघु व्यावसायिक, टपरीधारक यांनी उत्स्फुर्तपणे आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिला व मराठा आंदोलनास समर्थन दिले.
राज्य सरकराने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या. परंतु, परिपत्रकाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसले याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मराठा समाजाच्या वतीने १४ फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
'फलटण बंद' मध्ये शहरातील महात्मा फुले चौक, डेक्कन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रविवार पेठ, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिंगणापूर रोड, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, डी एड कॉलेज चौक, गिरवी नाका, गजानन चौक, पाचबत्ती चौक, आद्य कांतीविर उमाजी नाईक चौक या परिसरातील दुकाने व व्यवहार बंद होते.
No comments