Breaking News

फलटण येथील मराठा समाजाकडून सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाला एक लाखाहून अधिक सूचना व हरकती

सूचना व हरकतीसह मराठा क्रांती मोर्चा फलटणचे पदाधिकारी

More than one lakh suggestions and objections from the Maratha community in Phaltan to the Department of Social Justice and Special Assistance

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४  - मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द राज्य सरकारने पाळावा व सगेसोयरे अधिसूचनेचे विधेयक मराठा समाजाने सुचविलेल्या बदलासह अधिवेशनात मंजूर करून घ्यावे,तसेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार नियम व आदेश rni no. mahbil/2009/37831,अधिसूचना मधील क २ प्रमाणे सूचना व हरकती यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने तब्बल एक लाख सूचना व हरकती प्रमाणपत्र राज्य सरकारला आज पोस्टातून पाठवण्यात आल्या.

     मागील आठवडाभर मराठा क्रांती मोर्चा फलटण चे समन्वयकांनी फलटण तालुक्यातील गाव ना गाव तसेच वाडीवस्तीवर पोहोचून, सूचना व हरकत प्रमानपत्र पाठवावे यासाठी अतोनात प्रयत्न केले होते,त्या अनुषंगाने सकल मराठा समाजातील बांधवानी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून फॉर्म भरून घेतले व त्या सर्व प्रमाणपत्र एकत्र करून ते मराठा क्रांती मोर्चा समनवयकांच्या ताब्यात दिले,व ते व्यवस्थित जुळवून त्याचे एकत्रीकरण करून ते  एक लाख हुन अधिक फॉर्म आज पोस्टातून सामाजिक न्याय विभागाला मुंबईत पाठविण्यात आले.

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी फलटण तालुक्यातील मराठा समाज हा क्रांतिसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून राज्य सरकारने दिलेला शब्द पाळावा,व मनोज दादा यांनी पुन्हा सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेण्यासाठी लवकरात लवकर अधिवेशन बोलावून निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

No comments