संकेत भोसले हत्येच्या निषेधार्थ फलटण येथे निषेध मोर्चा व फलटण बंद ; मारेकऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी - मागणी
` फलटण दि.२६ - भिवंडी जि. ठाणे येथील दलित समाजातील अल्पवयीन युवक संकेत भोसले याची क्षुल्लक कारणावरून हत्या केल्याच्या निषेधार्थ, फलटण येथे आज २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता, विविध संघटना, पदाधिकारी व नागरिकांनी मोर्चा काढून, संकेत भोसले यांच्या मारेकऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. दरम्यान संकेत भोसले याच्या हत्येचा निषेधार्थ विविध संघटनांकडून फलटण बंदची हाक देण्यात आली होती, या आवाहनास फलटण शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी, लघु व्यावसायिक, टपरीधारक यांनी उत्स्फुर्तपणे आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिला.
विविध संघटनाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,भिवंडी जि. ठाणे येथील दलित समाजातील अल्पवयीन युवक संकेत भोसले याची क्षुल्लक कारणावरून निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण दलित समाज पेटून येथून उठला आहे. कॉलेज मधील किरकोळ वादातून हे हत्याकांड झाले आहे, संकेत भोसले या युवकास अपहरण करीत गंभीर मारहाण झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपीना कड़क शासन झाले पाहिजे, व त्या आरोपींवर मोक्का व UAPA या कायद्यांतर्गत कार्यवाही करून संकेत भोसले यास न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी फलटण बौद्ध समाजाच्या वतीने सरकार कडे करीत आहोत तरी या भीमसैनिकाला न्याय मिळावा आणि त्याच्या कुटुंबाचे पुनर्वसण करण्यात यावे अशी मागणी निवेदन नाव मध्ये करण्यात आली आहे.
No comments