Breaking News

फलटण शहरातील पालखीमार्गासह चौकांचे होणार सुशोभीकरण - खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

Phaltan city will beautify the squares along with Palkhi Marga - Mr. Ranjitsinh Naik Nimbalkar

७५ कोटी रुपये निधी मंजूर ; खा.रणजितसिंह व अधिकाऱ्यांनी केले इन्स्पेक्शन 

    'सुंदर फलटण - स्वच्छ फलटण' अशा ज्या फलटणकारांच्या अपेक्षा होत्या, आणि बारामतीमध्ये गेल्यानंतर, जी फलटणची तुलना होत होती, त्या अनुषंगाने आता या निधीच्या माध्यमातून फलटण देखील स्वच्छ आणि सुंदर होईल - खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर

    फलटण (ॲड. रोहित अहिवळे) दि.२१ - रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी फलटणला आले होते, त्यावेळी फलटण शहराच्या सुशोभीकरणासाठी आपण ७५ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी निधी मंजूर करण्याचा शब्द गडकरी साहेबांनी दिला होता, दिलेला शब्दा पाळणारा नेता म्हणून गडकरी साहेबांची ख्याती आहे, ती ख्याती खरी करत ना. गडकरी यांनी, फलटण शहराच्या विकासासाठी ७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये फलटण शहरात येणाऱ्या प्रत्येक चौकाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यापासून या सुशोभीकरणात सुरुवात होणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, महात्मा गांधी चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, उंबरेश्वर चौक,पाचबत्ती चौक, पिरॅमिड चौक व इतर चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटारांसाठी देखील निधी वापरला जाणार आहे. तसेच प्रत्येक चौकामध्ये पालखी विषयाला अनुसरून एक वेगळी थीम साकारण्यात येणार असल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

    फलटण शहरातील पालखीमार्ग व  सुशोभीकरणासाठी ७५ कोटी रुपये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पीडब्ल्यूडी ऑफिसचे अभियंता यांनी खा.रणजितसिंह यांच्यासह दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी फलटण शहरातील पालखी मार्गाचे  इन्स्पेक्शन केले. याप्रसंगी खा रणजितसिंह बोलत होते. यावेळी पीडब्ल्यूडी अधीक्षक अभियंता श्री.रोकडे, कार्यकारी अभियंता श्री. जाधव, श्री.खोसे, नगरसेवक माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अनुप शहा, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    पुढे बोलताना खासदारांची रणजितसिंह म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शहराच्या विकासासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, त्याचा देखील शुभारंभ आज आम्ही करत आहोत, प्रत्येक गल्लीतला कोपरा तसेच प्रत्येक चौक आपण या निधीतून सुशोभीकरण करणार आहे. दोन्ही मिळून जवळपास १०५ कोटी रुपये फलटणच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत, याचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून,  इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नामदार नितीन गडकरी यांचे फलटणच्या जनतेच्या वतीने खा. रणजितसिंह यांनी आभार मानले.  तसेच अभियंता रोकडे साहेब, जाधव साहेब व खोसे साहेब यांचे देखील आभार मानले.

    फलटण मधील ७.८० किलोमीटरचा पालखी मार्गासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सेंट्रल रिझर्व्ह फंडातून ७५ कोटी रुपये निधी मिळालेला आहे, याची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे, त्या अनुषंगाने आम्ही आज पालखी मार्गाचे इन्स्पेक्शन करून नोंदी घेताल्या आहेत. हा रस्ता संपूर्ण सिमेंट काँक्रेटचा होणार आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार प्रत्येक चौकात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. आज आम्ही या मार्गाचे इन्स्पेक्शन केले असून, नागरिकांनी दिलेल्या सूचना घेतलेल्या आहेत, यानंतर डीपीआर तयार होईल व त्यानंतर टेंडर प्रोसेस सुरू होणार असल्याचे पीडब्ल्यूडी अभियंता रोकडे साहेब यांनी सांगितले.

No comments