Breaking News

२५ फेब्रुवारी रोजी फलटण क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन

Phaltan Cross Country Competition organized on 25th February


     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ - फलटण जिमखाना , फलटण व फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती , फलटण  आयोजित  फलटण क्रॉसकंट्री स्पर्धा २०२४ चे आयोजन   रविवार  दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी   श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कुल, ( सी.बी. एस.ई.) जाधववाडी , फलटण येथे सकाळी ६.०० वाजता करण्यात आले आहे . साऊंड माईंड इन साउंड बॉडी Sound mind in a sound body या उक्ती नुसार मानवी जीवन आनंदी व समाधानी असण्यासाठी निरोगी मनाची आणि शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असतो. देशाच्या जडणघडणीत युवकांचे असणारे योगदान लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांबरोबर संपूर्ण युवा पिढीला  आरोग्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी या  स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले असून सर्व वयोगटातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन  आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

    सदर  फलटण क्राँसकंट्री स्पर्धे मधील वयोगट व अंतर खालीलप्रमाणे असणार आहे.

    फन रेस -  10 वर्षाआतील (मुले व मुली ) - 2 कि. मी., 15 वर्षे आतील (मुले व मुली ) - 3 कि. मी., 18 वर्षे आतील( मुले व मुली ) - 5 कि. मी.
 खुला गट - (पुरुष व महिला) -10  कि.मी., 30 वर्षापुढील ( पुरुष व महिला ) -7 कि. मी., 45 वर्षापुढील  (पुरुष व  महिला)  -5 कि. मी., 60 वर्षापुढील (पुरुष व महिला)  -3 कि. मी.

    नाव नोंदणी  अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2024 असणार आहे .  आणि नाव नोंदणी केलेल्या  स्पर्धकांनी प्रवेश फी जमा करुन आपले चेस नंबर दि. 22  व 23  फेब्रुवारी  2024  रोजी  सकाळी 7.00 वा. ते दु.1.00 वा. या वेळेत  मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर काँलेज , फलटण व श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कुल, ( सी.बी. एस.ई.) जाधववाडी , फलटण  येथून घेऊन जावेत.

    सदर स्पर्धेसाठी   खालीलप्रमाणे  पारितोषिक रोख रक्कम ,  मेडल , टी - शर्ट आणि प्रमाणपत्र  असणार आहे.
खुला गट -( पुरुष/ महिला )
प्रथम  क्रमांकास - 10,001/- 
द्वितीय  क्रमांक  -7001/- 
तृतीय क्रमांक -5001 /-  
18 वर्षे गट  (मुले - मुली )
प्रथम  क्रमांकास - 5001/- 
द्वितीय  क्रमांक  -3001/-  
तृतीय क्रमांक -2001 /-  व 

    15 वर्षे गट (मुले - मुली ), 30,45 व 60  वर्षापुढील पुरुष / महिला
प्रथम  क्रमांकास - 3001/-  
द्वितीय  क्रमांक  -2001/-  
तृतीय क्रमांक -1001 /-  

    सदर स्पर्धे मध्ये सहभागी  होणेसाठी  प्रवेश फी - 18 वर्षे गट (मुले -  मुली ) यांना 20 रु. आणि खुला गट  , 30 वर्षे व 45 वर्षे गट  पुरुष व महिला यांना 50  रु. असणार आहे.  10  वर्षे गट , 15 वर्षे  गट मुले  व मुली व 60 वर्षे गट महिला व पुरुष  यांना प्रवेश फी असणार नाही .

    वय निश्चितीसाठी  जन्मतारखेचा दाखला व   आधारकार्ड अनिवार्य  आहे . जन्मतारीख 25  फेब्रुवारी  2024 पर्यंतची ग्राह्य धरण्यात येईल.
स्पर्धा  रिपोर्टिंग पहाटे 5.30 वाजता  असून  या स्पर्धा ठिक 6.00  वाजता सुरु होतील.

    महत्त्वाची टिप - 1)  चेस नंबर असल्याशिवाय  स्पर्धेत सहभागी  होता येणार नाही . सदर स्पर्धा  अंतर  पुर्ण करणारे  खेळाडू वय वर्षे 10 , 15 ,18 व खुला गट  (महिला व पुरुष ) यांना  प्रमाणपत्र देण्यात येईल. आणि 30,45 व 60  वर्षापुढील पुरुष / महिला यांना शर्यत पुर्ण केल्याबद्दल  मेडल देण्यात येईल.

    रजिस्ट्रेशन करणेसाठी लिंक- 
https://forms.gle/43GCsDoUZgU76A1b6
अधिक माहितीसाठी संपर्क -
1) श्री.जनार्दन पवार - 9284765995
2) श्री. नामदेव  मोरे - 9960082120
3) श्री.सचिन धुमाळ - 9890382204
4)  श्री . राज जाधव - 9226139653
5)  डाँ. स्वप्नील पाटील - 770901629
6) श्री.तायाप्पा शेंडगे-  9322848199
7) श्री.उत्तम  घोरपडे-  9421121031
8)श्री . सुरज ढेंबरे - 8805777998
9) श्री.सुहास कदम  - 7083720520
10) श्री. अमित काळे - 9665569092

No comments