फलटण बस स्थानकात प्रवासी दिन उत्साहात साजरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ : फलटण बस स्थानकात रथसप्तमी दिवशी प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रवाशांना तिळगुळ देऊन रोपांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे सातारा जिल्हा संघटक किरण बोळे, फलटण तालुका एस टी प्रवासी संघटनेचे प्रमुख प्रा. शिवलाल गावडे, फलटण आगार व्यवस्थापक रोहित नाईक, बस स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतुक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतुक निरीक्षक सुखदेव अहिवळे, वाहक श्रीपाल जैन व एसटीचे अन्य अधिकारी व कर्मचारी व प्रवाशांची उपस्थिती होती.
No comments