राजधानी महासंस्कृती महोत्सव ; गांधी मैदान ते शिवतीर्थ शोभायात्रा संपन्न
सातारा दि.११:- सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचनालय व सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त गांधी मैदान ते शिवतीर्थ शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेची सांगता करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात शोभा यात्रेला सुरुवात
शोभा यात्रेला ढोल ताशांच्या गजरात, हलगीच्या निदनात व गजनी नृत्याने सातारा येथील गांधी मैदानावर सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत सर्व विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पारंपारिक पोशाख उपस्थित होते.
शोभायात्रा शिवतीर्थावर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.युवराज करपे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा जाती पडताळणी समितीच्या उपायुक्त स्वाती इथापे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, नगर प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
No comments