Breaking News

रामदास कदम यांना महाराष्ट्र शासनाचा "उद्यानपंडित"पुरस्कार जाहीर

Ramdas Kadam has been awarded the "Udyan Pandit" award by the Government of Maharashtra

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - महाराष्ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  व्यक्ती किंवा संस्था यांना त्यांच्या शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, यामध्ये गिरवी ता.फलटण गावचे सुपुत्र व कुरोली फूड्स, कोळकी ता.फलटण'चे संचालक, तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सातारा (यशवंत कृषी मंच अध्यक्ष), शेतीतज्ञ, कृषिरत्न रामदास भुजंगराव कदम यांना महाराष्ट्र शासनाचा "उद्यानपंडित"पुरस्कार जाहीर झाला आहे.

    या पुरस्काराबद्दल सर्वत्र रामदास कदम यांचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.

No comments