फलटणच्या ऋतुजा गाटेला खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेत तिरंदाजीमध्ये ब्राँझ मेडल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - फलटणची सुकन्या कु. ऋतुजा विनय गाटे हिने शिलाँग येथे सुरू असणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३ मध्ये तिरंदाजी खेळात कंपाउंड मिक्स प्रकारामध्ये, चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत, आपल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघास ब्राँझ पदक मिळवून दिले आहे.
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३ मधील तिरंदाजी स्पर्धेला शिलॉंग येथील नॉर्थ ईस्ट हिल युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सेंटरमध्ये सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री शकलियार वर्जरी उपस्थित होते. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३ या तिरंदाजी स्पर्धेत ३३ हून अधिक विद्यापीठे सहभागी झाले आहेत. या स्पर्धा २९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.
सध्या कु. ऋतुजा ही विद्या प्रतिष्ठान बारामती येथे बीसीए शिक्षण घेत असून, तिने स्कूल नॅशनल मध्ये ब्राँझ मेडल, महाराष्ट्र ऑलिम्पिक मध्ये गोल्ड, युनिव्हर्सिटी झोनल मध्ये गोल्ड मेडल मिळविले, तिला शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कोच चंद्रकांत इलग व सुरज ढेंबरे (फलटण) यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
No comments