फलटणमध्ये आजपासून "शायनिंग महाराष्ट्र" प्रदर्शनाचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ - माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कल्पकतेतून दिल्ली येथील सांसा फाउंडेशनच्या वतीने फलटण येथील शुभारंभ लॉन्स येथे सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी यादरम्यान "शायनिंग महाराष्ट्र २०२४" या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना व खात्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली देण्याच्या हेतूने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनातून हे प्रदर्शन होत असल्याची माहिती फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघ भाजपा अध्यक्ष सचिन कांबळे - पाटील यांनी रविवारी पत्रकारांना दिली.
ते पुढे म्हणाले की, सोमवार दि. १९ रोजी सकाळी ११ वाजता सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून भाजपाचे जेष्ठ नेते प्रल्हादराव सालुंखे-पाटील, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, ऐड. नरसिंग निकम, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष तुकाराम शिंदे, फलटण नगर परिषद गतनेते अशोकराव जाधव, विधानसभा प्रभारी विश्वासराव भोसले, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष धनंजय पवार, अल्पसंख्यांक राज्य उपाध्यक्ष अनुप शहा, किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर, महादेव अलगूडे, महादेव पोकळेआदी मान्यवर प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सरकारच्या विविध खाती आणि योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी यासाठी ग्रामीण भागात प्रदर्शन आयोजित करण्यासाठी सांसा फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था काम करते. या उपक्रमातून यावेळी फलटण येथे हे प्रदर्शन होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये भारत सरकारच्या कृषी विभाग, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभाग, डीआरडीओ, भूजल सर्वेक्षण, आयुष, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल केमिकल फर्टीलायझर, खादी उद्योग, राष्ट्रीय बांबू मिशन, राष्ट्रीय मानक बुरो, हातमाग, ताग उद्योग, हस्तकला उद्योग अशा भारत सरकारच्या विविध खाती आणि उपक्रमांचे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी याबांबतची माहिती लोकांना सांगणार आहेत. विद्यार्थी, महिला, नागरिक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटाच्या नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोफत असणार आहे . देश पातळीवरील या प्रदर्शनाचा फलटण मधील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बजरंग गावड़े, अमोल सस्ते, संतोष गावड़े, सनी मदने, उषा राऊत यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने देशवासीयांसाठी राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांची माहिती ग्रामीण भागांतील सर्व सामान्य माणसाना व्हावी या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. संरक्षण विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संरक्षण साहित्याच्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत.
No comments