श्री दत्त इंडियाने केले ६.५ लाख मे. टन उसाचे गाळप ; प्रतिटन ३,१०० रुपयेप्रमाणे रक्कम बँकेत जमा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० - श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी, ता. फलटण या साखर कारखान्याने सन २०२३ - २४ च्या चालू वर्षीच्या गळीत हंगामात दि. ६ फेब्रुवारी अखेर ६ लाख ४३ हजार ६५१ मे. टन ऊस गाळप केले असून त्यापैकी दि. १५ जानेवारीअखेर गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३,१०० रुपये प्रमाणे १५५ कोटी ४७ लाख १५ हजार ५९३ रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे. यावेळी जनरल मॅनेजर फायनान्स अमोल शिंदे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी भागनवर, युनियन जनरल सेक्रेटरी राजेंद्र भोसले उपस्थित होते.
या वर्षीच्या गळीत हंगामात दि. १५ जानेवारी अखेर गाळपास आलेल्या ५ लाख १ हजार ५२१.०४६ मे. टन उसाला प्रतिटन ३,१०० रुपयेप्रमाणे १५५ कोटी ४७ लाख १५ हजार ५९३ रुपये ७ हजार ४२९ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली. गळीत हंगाम अद्याप वेगात सुरू असून मंगळवार, दि. ६ फेब्रुवारी अखेर ६ लाख ४३ हजार ६५१ मे. टन उसाचे गाळप झाले असून या वर्षी ८ लाख मे. टनाहून अधिक गाळपाचे उद्दिष्ट असून ते निश्चित पूर्ण होईल अशी अपेक्षा प्रशासन अधिकारी जगताप यांनी व्यक्त केली आहे.
No comments