Breaking News

चौधरवाडी येथे माती व पाणी परीक्षण कार्यक्रम संपन्न

Soil and water testing program completed at Chaudharwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या आठव्या सत्रातील उद्यानकन्यांद्वारे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ८ फेब्रुवारी २०२४ रोजी  चौधरवाडी ग्रामपंचायत  येथे माती व पाणी परीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मा. डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात मॅडम तसेच अध्यक्ष मा. सरपंच श्री.तुकाराम कोकाटे उपस्थित होते. त्यानंतर या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात मॅडम  यांनी अनेक माती विषयक प्रश्न जसे की जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब ,जमिनीचा सामू, सूक्ष्म अन्नद्रव्ये व त्यात विद्राव्य क्षाराचे प्रमाण जपन्यासाठी सातत्याने माती परीक्षण का करायचे ही माहिती दिली आणि अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मा. सरपंच श्री.तुकाराम कोकाटे यांनी उद्यानकन्या व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहिर केले. 

    हा कार्यक्रम श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी , प्रा. जे. व्ही. लेंभे व प्रा.ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या भोईटे पायल,देशपांडे सई ,गोळे विभूती,जाधव साक्षी,लाळगे श्वेता, नाळे निकिता यांनी यशस्वीरीत्या पार पाडला.

No comments