हळदी - कुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद ; मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल महिलांचे आभार - श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर
हात जोडून महिलांचे स्वागत करताना श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर (छाया : योगायोग फोटो, फलटण.) |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - एक परंपरागत सांस्कृतिक सण साजरा करण्यासाठी फलटण - कोरेगांव विधानसभा मतदार संघातील महिलांना एकत्र आणून त्यांच्या मध्ये विचारांची देवाण घेवाण घडविण्याबरोबर महिलांना मुक्त संचाराद्वारे आपल्या कला गुणांना वाव देता यावा हा मुख्य उद्देश हळदी - कुंकू समारंभाचे आयोजन करण्यामागे असल्याचे नमूद करीत महिलांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित महिलांना धन्यवाद दिले.
दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने हळदी - कुंकू समारंभ व महिला मेळाव्याचे उदघाटन करताना श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर व अन्य मान्यवर |
श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था मर्यादित फलटण, फलटण एज्युकेशन सोसायटी, जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली आणि राजे ग्रुप, फलटण यांचे संयुक्त सहभागाने शनिवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्रौ १० या वेळेत मुधोजी हायस्कूल फलटणच्या प्रांगणात हळदी - कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह श्रीमंत सौ. मिथिलाराजे सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, सौ. वैशाली दिपकराव चव्हाण, मावळत्या नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या प्रमुख ॲड. सौ. मधुबाला भोसले, सौ. प्रतिभा चेतन शिंदे, के. बी. एक्स्पोर्ट कंपनीच्या संचालिका सौ. सुजाता यादव, माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, सौ. लतिका अनपट, सौ. प्रतिभा धुमाळ, सौ. वैशाली गावडे, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कु. अक्षदा ढेकळे, दुधेबावीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.भावना सोनवलकर, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्या सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, सौ. जयश्री सस्ते, सौ. प्रगती कापसे, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. वैशाली चोरमले, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. दिपाली निंबाळकर, प्रा. सौ. निलम देशमुख, लायनेस क्लबच्या सौ. निलम लोंढे - पाटील, सौ. उज्वला निंबाळकर, सौ. सविता कापडी, नूरजहाँ सय्यद, पुनम भिसे यांच्या सह विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी, महिला सरपंच, सदस्य, सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्थेच्या सर्व संचालिका, जनरल मॅनेजर प्रतापसिंह नाईक निंबाळकर, प्राचार्य गंगावणे सर आणि जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली यांनी फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील मोठ्या संख्येने उपस्थित महिलांचे स्वागत करुन त्यांना वाण - वसा व हळदी - कुंकू दिले.
उपस्थित महिलांना करमणूक व त्यांना आपल्या कला गुणांना संधी देता यावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या फनी गेम्सला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक बक्षिसे जिंकली. एक अनोखा हळदी - कुंकू समारंभ आयोजित केल्याबद्दल या महिलांनी श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.
No comments