Breaking News

तलाठी पदभरती : निवड व प्रतिक्षायादीतील उमेदवारांनी कागदपत्रे व बायोमॅट्रिक तपासणीसाठी उपस्थित रहावे

Talathi Recruitment : Selected and waiting list candidates should appear for documents and biometric verification

सातारा दि.2 (जिमाका) :  सातारा जिल्हयातील तलाठी पदभरती 2023 साठभ्‍ टि.सी.एस. कंपनीमार्फत घेणेत आलेल्या ऑनलाईन परिक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा निवड समिती, सातारा यांनी निवड केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा च्या www.satara.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 23 जानेवारी 2024  रोजी प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेमार्फत कागदपत्रे तपासणी व टी.सी.एस. कंपनीमार्फत बायोमेट्रीक तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणी प्रक्रियेसाठी निश्चित करणेत आलेले दिनांक, वेळ व ठिकाण, इ. बाबतचा तपशिल जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेमार्फत कागदपत्रे तपासणी प्रक्रियेसाठी निश्चित केलेले दिनांक, वेळ व ठिकाण, इ. बाबतचा तपशिल प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.

दिनांक 5 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग- अराखीव, निवड यादी - अ.क्र. 1 ते 48, एकूण उमेदवारांची संख्या - 48

दिनांक 6 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग- अराखीव, प्रतिक्षा यादी अ.क्र. 1 ते 40, एकूण उमेदवारांची संख्या - 40

दिनांक 7 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग- अनुसूचित जाती- निवड यादी - अ.क्र. 1 ते 20- एकूण उमेदवारांची संख्या-20, प्रतिक्षा यादी - अ.क्र. 1 ते 17- एकूण उमेदवारांची संख्या-17, सामाजिक प्रवर्ग- अनुसूचित जमाती - निवड यादी - अ.क्र. 1 ते 10- एकूण उमेदवारांची संख्या-10

दिनांक 8 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -अनुसूचित जमाती- प्रतिक्षा यादी अ.क्र. 1 ते 9- एकूण उमेदवारांची संख्या-9, सामाजिक प्रवर्ग -वि.जा.अ.- निवड यादी - अ.क्र. 1 ते 7- एकूण उमेदवारांची संख्या-7-प्रतिक्षा यादी - अ.क्र. 1 ते 9- एकूण उमेदवारांची संख्या-9, - सामाजिक प्रवर्ग - भ.ज.ब.- निवड यादी अ.क्र. 1 ते 7- एकूण उमेदवारांची संख्या-7, प्रतिक्षा यादी - अ.क्र. 1 ते 8, - एकूण उमेदवारांची संख्या-8

 दिनांक 9 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -भ.ज.क- निवड यादी अ.क्र. 1 ते 9, एकूण उमेदवारांची संख्या-9, प्रतिक्षा यादी - अ.क्र. 1 ते 11- एकूण उमेदवारांची संख्या-11,  सामाजिक प्रवर्ग - भ.ज.ड.- निवड यादी अ.क्र. 1 ते 3- एकूण उमेदवारांची संख्या-3, प्रतिक्षा यादी - अ.क्र. 1 ते 6, - एकूण उमेदवारांची संख्या-6,   

सामाजिक प्रवर्ग -वि.मा.प्र.- निवड यादी अ.क्र. 1 ते 2- एकूण उमेदवारांची संख्या-2, प्रतिक्षा यादी - अ.क्र. 1 ते 3, - एकूण उमेदवारांची संख्या-3,

दिनांक 12 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -इ.डब्ल्यू.एस.- निवड यादी अ.क्र. 1 ते 12, एकूण उमेदवारांची संख्या-12, प्रतिक्षा यादी - अ.क्र. 1 ते 10- एकूण उमेदवारांची संख्या-10,  सामाजिक प्रवर्ग -इ.मा.व-  प्रतिक्षा यादी - अ.क्र. 1 ते 22- एकूण उमेदवारांची संख्या-22, 

दिनांक 13 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -इ.मा.व- निवड यादी अ.क्र. 1 ते 37- एकूण उमेदवारांची संख्या-37

कागदपत्रे तपासणीचे ठिकाण व वेळ- जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, नियोजन भवन, सकाळी 11.00 वा

 टी.सी.एस. कंपनीमार्फत करणेत येणाऱ्या बायोमेट्रीक तपासणी प्रक्रियेसाठी निश्चित केलेले दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी-10.00वा भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), विभागीय कार्यालय सातारा, कँटीन हॉल, तळ मजला. (जिल्हाधिकारी कार्यालय सातारा चे समोर) येथे करण्यात येणार आहे.

यामध्ये संख्या-निवड यादी-155, प्रतिक्षा यादी-135, एकुण-290 अशा उमेदवारांची बायोमेट्रीक तपासणी करण्यात येणार आहे.

तरी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा चे www.satara.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 23 जानवारी 2024 रोजी प्रसिद्ध करणेत आलेल्या निवड व प्रतिक्षा यादीतील सर्व उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेमार्फत करणेत येणाऱ्या कागदपत्रे तपासणीसाठी व टि. सी. एस. कंपनीमार्फत करणेत येणाऱ्या बायोमेट्रीक तपासणीसाठी वरील नमूद दिनांक, वेळी व ठिकाणी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह बिनचूकपणे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments