Breaking News

जबाबदारी समजून घेत निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Understand the responsibility and conduct the election process in peace and order - Collector Jitendra Dudi

सातारा दि. 3 (जि.मा.का): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये लक्षपूर्वक व काळजीपूर्वक दिलेल्या सूचना समजून घ्याव्यात व त्याप्रमाणे आपापल्या नेमून दिलेल्या जबाबदा-या पार पाडाव्यात असे निर्देशही दिले. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. 3 फेब्रुवारी रोजी कायदा सुव्यवस्था, आदर्श आचार संहिता, क्षेत्रिय अधिकारी यांची कर्तव्ये, कार्यपध्दती व जबाबदा-या, आदर्श आचारसंहिता भरारी पथकांची कार्यपध्दती व एक खिडकी योजना या विषयांचे प्रशिक्षण जिल्हा परिषद, स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्येशीय सभागृहात   येथे पार पडले. यामध्ये ते बोलत होते.
सर्व क्षेत्रिय अधिकारी यांनी पोलीस क्षेत्रिय अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व मतदान केंद्रांचे परीक्षण करून Vulnerability Mapping प्रक्रिया पूर्ण करावी व सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कामकाज करून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पदध्तीने पार पाडावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 

निर्देश सर्व विभागांना दिले. तसेच निवडणूक प्रक्रीया पार पाडताना कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले.
पोलीस अधिक्षक समीर शेख  यांनी पोलीस प्रशासनातील सर्व प्रशिक्षणार्थींना सदरचे प्रशिक्षण लक्षपूर्वक घेणेबाबत व त्याप्रमाणे प्रत्यक्ष निवडणूक कामकाज जबाबदारीने पार पाडण्यासाठी  सूचना दिल्या. स्थानिक पातळीवर व उपविभाग स्तरावर पोलीस विभागाचे व्यापक स्वरुपात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याकरिता सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे याबाबत निर्देश दिले.
कायदा व सुव्यवस्था आणि क्षेत्रिय अधिकारी कर्तव्ये कार्यपध्दती व जबाबदा-या याबाबतचे प्रशिक्षण, उपविभागीय अधिकारी सातारा सुधाकर भोसले यांनी घेतले. तसेच, आदर्श आचार संहिता व आचारसंहिता पथकांची कार्यपध्दती आणि एक खिडकी योजना, याबाबतचे मार्गदर्शन जिल्हा पुनवर्सन अधिकारी मनोहर गव्हाड यांनी केले.

सदर प्रशिक्षणाचे नियोजन नोडल अधिकारी, प्रशिक्षण व्यवस्थापन तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो)  विजया यादव यांनी केले.  तसेच,  निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील,   उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भगवान कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, यांच्यासह या प्रशिक्षणास पोलीस प्रशासनातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस उपअधिक्षक गृह, LCB, DSB, पोलीस निरीक्षक तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस अधिकारी व Sector Police Officer असे एकूण 245 व सर्व तालुक्यांचे निवडणूक नायब तहसिलदार, सर्व लोकसभा मतदार संघातील नेमणूक करण्यात आलेले Sector Officers असे एकूण 377 एवढे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

No comments