Breaking News

उपजिल्हा रुग्णालय फलटण स्टाफ निलंबित करावा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाकडून मागणी

वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय फलटण यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी
Upazillha Hospital Phaltan Staff should be suspended - Demand from Nationalist Congress Party Social Justice Department

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १४ - उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील बेजबाबदार रुग्णसेविका, नर्सेस व स्टाफ यांच्यावर कारवाई करुन निलंबित करावे अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय फलटण यांना देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष हरीश काकडे, फलटण शहर अध्यक्ष सिद्धार्थ काकडे, प्रफुल अहिवळे, लक्ष्मण काकडे, विशाल पोतेकर, सनी कदम, सचिन अहिवळे उपस्थित होते.

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण व तालुक्यातील सर्व सामान्य लोक वैद्यकीय उपचार घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात येत असतात. परंतु या ठिकाणी काम करत असलेला रुग्णसेविकांचा स्टाफ वॉर्ड बॉय तसेच इतर कर्मचारी बेजबाबदारपणे काम करत असताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातून अॅडमीट झालेली रुग्ण व त्यांच्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित वागणुक दिल्या जात नाही. तसेच रुग्णालयातील रुग्णसेविका (नर्सेस) गिरमे या वृध्द महिला पुरुष यांना एकेरी व अरेरावीची भाषा वापरुन अपमानित केले जात असलेचे पहावयास मिळत आहे. तसेच ते रुग्णांची सेवा देण्यास असमर्थता दाखवत आहे. या कारणास्तव ग्रामीण भागातील रुग्ण अर्धवट उपचार घेऊन घरी जात आहेत. या सर्व कारणामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. तसेच लेबोरेटरी (लॅब) मध्ये दुर्लक्ष केल्यामुळे कोणत्याही रुग्णांचे, कोणत्याही रुग्णांना लेबल लावल्यामुळे तपासणी हानिकारक होत आहे. ज्या रुग्णांना जो आजार झालेलाच नाही अशा रुग्णांना गंभीर आजाराची लागण झालेली असे तपासणी रिपोर्ट येत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

    त्याचबरोबर एखादया जनावरांना किंवा गुन्हेगारांना क्रुरतेची वागणुक दिली जाते, त्या पध्दतीची वागणुक याठिकाणी रुग्णसेविका (नर्सेस) देत आहेत. त्या ठिकाणी स्वच्छता कोणत्याही पध्दतीची दिसत नसुन सर्वत्र घाणीचे साम्राज्य झालेले आहे. प्रसाधन गृहात स्वच्छता नाही. पाण्याची व्यवस्था नाही, त्याचबरोबर व्यवस्थित चांगल्या प्रतीचे जेवण वेळेवर मिळावे, बेडवर दैनंदिन बेडसिट स्वच्छता नाही. ग्रामीण भागातील व शहरातील व तालुक्याच्या बाहेरील रुग्णांना आदराची वागणूक दिल्या जात नाही. तसेच बाहेरील औषधे चिठ्ठीवर लिहुन न देता रुग्णालयातच औषधे उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच अस्थिरोगतज्ञ (हाडांचे डॉक्टर) या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. दिवस व रात्रपाळी साठी नियमात दिलेल्या वेळेत डॉक्टर उपस्थित असावेत. तसेच बेजबाबदार नर्सेस वॉर्ड बॉय व स्टाफ हे रुग्णांकडे लक्ष न देता ग्रुप ग्रुपने टवाळके करत, चेष्टा, मस्करी करत, मोबाईल चाळत बसलेले असतात. त्यामुळे रुग्णांना सेवा देण्यास रुग्णांच्या नातेवाईकांना चिडचिड करत असतात. अशा बेजबाबदार नर्सेसवर तातडीने कारवाई करुन त्यांना दवाखान्यातून निलंबित करण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यायच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल याची गांर्भीयाने दखल घ्यावी.

No comments