Breaking News

लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर फलटण पोलीस विभागाकडून जातीय दंगा काबू योजनेंतर्गत रंगीत तालीम

In the background of Lok Sabha Election-2024, Phaltan Police Department conducted a colorful exercise under the communal riot control scheme

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   - लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभुमीवर  दि.१९/०३/२०२४ रोजी दुपारी १२.१० ते १३.४० वा. च्या दरम्यान फलटण विमानतळ येथे जातीय दंगा काबु योजनेंतर्गत रंगीत तालीम घेण्यात आली.

    जातीय तणाव निर्माण झाल्यास, जातीय दंगा झाल्यास समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी होत असते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच या अनुषंगाने करावयाच्या उपयायोजनांचे पोलीस दलास प्रशिक्षण दिलेले असते. या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणुन  दि. १९/०३/२०२४ रोजी फलटण पोलीस विभागाकडुन जातीय दंगा काबू योजनेंतर्गत रंगीत तालीम घेण्यात आली.

    मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली या रंगीत तालीम मध्ये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस, फलटण विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण विभागातील शिरवळ, खंडाळा, लोणंद, फलटण ग्रामीण आणि फलटण शहर या पोलीस ठाणेंकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या सहीत रंगीत तालीममध्ये फलटण नगर परिषद, फलटण रुग्णवाहीका आणि अग्निशामक दलाने सहभाग घेतला.

No comments