Breaking News

खा. रणजितसिंह यांच्या तातडीच्या मदतीमुळे आणखी एकाचे प्राण वाचले

Another life was saved due to MP Ranjitsingh's urgent help

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - पालखी महामार्गावर बडेखान ता. फलटण येथे पिकअप ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने पिकअपचा ३-४ पलटी घेऊन गंभीर अपघात झाला.  यामध्ये ड्रायव्हर गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. याचवेळी या ठिकाणावरून माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीचा ताफा जात असताना, खासदार रणजितसिंह यांनी गाडी थांबवून, अपघात स्थळी जाऊन, अतीशय जलद गतीने  अपघातग्रस्ताला तुम्हाला काही होणार नाही बिलकुल चिंता करायची गरज नाही असा आधार देत, उपचारासाठी स्वतः च्या ताफ्यातील गाडीने तातडीने सिद्धिविनायक हॉस्पिटल, लोणंद येथे घेऊन गेले व अपघातग्रस्ताचा जीव वाचविला.

  या अपघातात पिकअप चा ड्रायव्हर कोथरूड पुणे येथील संतोष बोडके गंभीर जखमी झाले असून, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने मदत कार्य केल्यामुळे त्यांचा जीव वाचविण्यात खा. रणजितसिंह यांना यश आले. 

     मागील दोन दिवसांपूर्वी सुरवडी येथील जगताप वस्तीवर झालेल्या अपघातातील अपघातग्रस्तांना खा. रणजितसिंह यांच्यामुळे अशाच प्रकारे तातडीने मदत केल्यामुळे दोघांचे जीव वाचवण्यात त्यांना यश आले होते. 

No comments