Breaking News

वृद्धाकडून पैश्याची पिशवी हिसकावून जबरी चोरीचा प्रयत्न

Attempted robbery by snatching a bag of money from an old man

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटणच्या बाजारपेठेत सोने तारण कर्जाचे पैसे भरावयास जाणाऱ्या वृद्धाकडून एक लाख 22 हजार रुपयांची पैशाची पिशवी हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी, अशोक खंडेराव भगत ,वय- ७० वर्षे ,मेहता हाईट्स रविवार पेठ फलटण हे दि. १ मार्च २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास उघडा मारुती मंदिराजवळील मुथूट फायनान्स कंपनीचे ऑफिस समोर रविवार पेठ फलटण येथे गोल्ड लोणची कर्जरक्कम भरण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे  १ लाख २२ हजार रुपयांची रक्कम एक कापडी पिशवीमध्ये होती.   त्यावेळी पाठीमागून काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमानी, ती पैश्याची पिशवी हिसकावून चोरून नेण्याचा प्रयत्न करून भगत याना जखमी केले असल्याची फिर्याद अशोक खंडेराव भगत यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

No comments