Breaking News

पहिल्या १० खासदारांमध्ये समावेश असल्याने आपल्याला पुन्हा उमेदवारी : उमेदवार बदलाची मागणी विचारात घेतली जाणार नाही : खा. रणजितसिंह

Being included in the first 10 MPs, you will not be re-candidated: Demand for change of candidate will not be considered: Mr. Ranjit Singh

    फलटण दि. २३ : माढा लोकसभा मतदार संघातील लोकांच्या अपेक्षांची पूर्तता, शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी घेतलेली मेहनत आणि संसदेतील काम यामुळे पहिल्या १० खासदारांमध्ये आपला समावेश असल्याने महाविकास आघाडीने आपल्याला पुन्हा उमेदवारी दिली असल्याचे निदर्शनास आणून देत उमेदवार बदलाची मागणी विचारात घेतली जाणार नाही असा विश्वास खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

    वारकरी भवन, महतपुरा पेठ, फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते, यावेळी ॲड. नरसिंह निकम, भाजप सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, धनंजय साळुंखे पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भाजप अध्यात्म आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोकराव जाधव, अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनुप शहा उपस्थित होते.

    पक्षाच्यावतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उमेदवार बदलेल असे कोणाला वाटत असेल, परंतू तशी कुठलीही उमेदवारी बदलली जात नाही, कारण उमेदवारी जाहीर करताना त्याबाबत सर्व निकष लावलेले असतात, विचारपूर्वक उमेदवारी जाहीर केली जाते, तथापि उमेदवार बदलावा हे महायुतीमधील घटक पक्षाच्या काही नेत्यांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मत असू शकते, पण त्याबाबत त्यांची समजूत काढणे व त्यांना महायुतीचा धर्म पाळायला सांगण्याची जबाबदारी ही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची आहे, आणि ते महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास यावेळी  खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

    उमेदवारी जाहीर झाल्यापासून उमेदवार म्हणून या गृहस्थाने साधा फोन करुन मदतीची अपेक्षा व्यक्त केली नाही, मग आम्ही त्यांना मतदान का करावे असा सवाल करीत, त्यांनी आपल्याशी संपर्क करावा, आमची माफी मागावी अशी मागणी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केल्याचे निदर्शनास आणून देताच, आपल्यापेक्षा शहर व तालुक्यातील लोकच त्यांना आगामी निवडणुकीत खा. रणजितसिंह यांना मतदान का करावे या विषयी सांगतील,  राजे गटांतील जवळपास ९०% लोकांनी आपल्याला फोन करुन शुभेच्छा दिल्या असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

    महायुतीमधील घटक पक्षांच्या संपर्काबाबत आपल्या पक्षाकडून योग्य संदेश येईल त्याप्रमाणे आपण योग्य कार्यवाही निश्चित करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

    गत निवडणुकीत आपण फलटण मधून मताधिक्य घेतले आहे, यावेळी तर मतदार राजा आपल्याला भरभरुन मतदान करेल कारण गेल्या ५ वर्षात लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आपण सतत प्रयत्नशील राहिलो, त्यातून या तालुक्यात प्रलंबीत असलेली आणि नव्याने मंजूर करुन घेतलेली पाटबंधारे प्रकल्प, रेल्वे, रस्ते, औद्योगिक वसाहत, नवीन शासकीय कार्यालयांना मंजुरी, काही कार्यालय सुरु करणे यासह विविध विकास कामे केली आहेत, लोकांना नागरी सुविधा आणि अपेक्षा पूर्ती करणारा लोकप्रतिनिधी मिळाल्यामुळे यावेळी आपण फलटणसह संपूर्ण माढा मतदार संघात मोठे मताधिक्य घेणार असल्याचा विश्वास खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

    आपल्याकडे तालुक्याचे व जिल्ह्याचे नेतृत्व दिले तर संपूर्ण जिल्ह्याचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देताच त्याबाबत बोलणे उचित होणार नाही, तथापि आपल्याला नेतृत्वाची संधी मिळताच आपण कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजूर करुन आणली, त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेऊन विकास कामांची पूर्तता केली, शेतकरी व जनता यांच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या धोम - बलकवडी पाटबंधारे प्रकल्पात नीरा - देवघरचे पाणी आणून तो प्रकल्प बारमाही केला, नीरा -  देवघर प्रकल्पाच्या फलटण व माळशिरस तालुक्यातील कालव्याची रखडलेली कामे सुरु करुन ते पाणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहचविण्याची महत्वपूर्ण योजना बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरु करुन मार्गी लावली, नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहत, सिंचन भवन, आर. टी. ओ. कार्यालय, शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांसाठी स्वतंत्र प्रशस्त इमारती, सेशन कोर्ट, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालय, विविध भागातील रस्ते, महामार्ग अशी महत्त्वाची कामे मंजूर होऊन त्यांची कामे सुरु  होण्यासाठी निधीच्या तरतुदी झाल्या, काही कामे सुरु झाली आहेत, नियोजित पासपोर्ट ऑफिस, अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यालयांचा समावेशही नियोजित कामांमध्ये असणार आहे. त्यामुळे या सर्व विकास कामांचा आढावा घेतला तर तालुक्याचे नुकसान झाले की विकास झाला हे सर्वसामान्य जनताच ठरवेल असा विश्वास खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

    आपल्याला दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याकरिता आपल्या घरचा उमेदवार आहे, या दृष्टीने तालुक्यातील जनतेने व तरुणाईने बाहेर पडणे आवश्यक आहे. शहर व तालुक्याच्या भल्यासाठी विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा आपल्या पाठीमागे उभे राहुन आशीर्वाद देणे गरजेचे आहे. मला सुंदर फलटण व आदर्श फलटण घडवायचे आहे त्यासाठी सर्वांनी एकमताने साथ करावी असे आवाहन यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

    पुन्हा निवडून आल्यानंतर अपूर्ण राहिलेला फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग, फलटण - बारामती रेल्वे मार्ग, अमृत भारत योजनेतून मंजूर असलेला फलटण रेल्वे स्थानकाचा विकास, संपूर्ण तालुका १०० % बागायत होत असताना येथे कृषी विकासाच्या योजना प्राधान्याने राबवून एकरी उत्पादन वाढ, फळ व फळभाज्या प्रक्रिया उद्योग उभारणी, शेतमालाला बाजार पेठ मिळवून देवून एकरी उत्पन्न वाढ, आरोग्य सुविधांसाठी सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी यासह लोकांच्या अपेक्षा पूर्तीसाठी झोकून देवून काम करण्याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

    महाविकास आघाडीकडून आ. महादेव जानकर आपल्या
विरोधात लढणार असतील तर  त्यांचे स्वागतच करतो. त्यांनी वेगवेगळ्या चळवळीत काम केलेले आहे. जिल्ह्यामधून ते मंत्रीही राहिलेले आहेत. माझ्या मनात त्यांच्याविषयीच्या सदभावना असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

No comments