Breaking News

लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या कामाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते भूमीपूजन

Bhoomipujan by District Collector Jitendra Dudi of People's Leader Sr. Balasaheb Desai Memorial Work

    सातारा दि.4 (जिमाका) : लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या पोवई नाका येथील स्मारकाच्या कामाचे भूमीपूजन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते करण्यात आले.

    यावेळी पोलीस अधिक्षक समीर शेख, सातारा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बापट, रवीराज देसाईृ, जयराज देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर, माजी नगराध्यक्ष ॲङ दत्तात्रय बनकर, अण्णा वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    सातारा शहरात पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचे स्मारक विकसित करण्यासंदर्भात उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री यांनी जून 2023 मध्ये बैठक घेऊन या कामाचा सातारा नगर परिषदे मार्फत सविस्तर आराखडा तयार करुन सादर करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. याबाबत जिल्हा नियोजन कार्यालयाकडे 1 कोटी 36 लाख 38 हजारांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करुन देण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पामध्ये आयलँड बांधकाम, लँड स्केपींग, कारंजे व लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई यांचे म्युरल्स यांचा समावेश आहे. या स्मारकामुळे शहराच्या सौदर्यांत भर पडणार आहे.

No comments