Breaking News

टेंडर नसलेल्या कामांचे राजे गटाकडून भूमिपूजन ; फलटणकरांची फसवणूक - अशोकराव जाधव

Bhoomipujan by Raje Group for non-tendered works - Ashokrao Jadhav

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - राजे गटाकडून दोन दिवसा पूर्वी पत्रकार परिषद घेऊन फलटण शहरातील विकास कामांची यादी वाचली गेली. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकास कामांची धडकी घेऊन, गेली ३० वर्षे झोपलेले नेते आज जागे झाले आहेत आणि फक्त मंजुरीच्या जोरावर भूमिपूजनाचा घाट राजे गटाने घातला आहे,  ही वेळ तुमच्यावर का आली याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. फलटण शहरांतील जनतेला कायम ग्रहित धरून चालणाऱ्या नेत्यांना या आधी विकास कामे का सुचली नाहीत असा सवाल करत  ज्या कामांची टेंडर प्रोसेस नाही, वर्क ऑर्डर नाही अशा कामांची भूमिपूजन घेणे म्हणजे फलटणकरांची शुद्ध फसवणूक असल्याचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी सांगितले.

मलठण मध्ये गेली ७ वर्षांत १ रुपयाही न टाकणाऱ्या व मंजूर असलेली कामे, जिल्हाधिकारी यांच्याकडून रद्द करून, आणणाऱ्या राजे गटाच्या स्वीकृत नगरसेवकास आज मलठणची आठवण झाली का ? असा प्रश्न उपस्थित करून, तुमचा हिशोब फलटणची जनता आता निवडणुकीत करणार आहे,  अशा बेकायदेशीर भूमिपुजनास जनता आता भूलनार नाही व अशा भूमिपूजनास जनताच विरोध करेल असे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी सांगितले.

No comments