Breaking News

काकासाहेब खराडे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला चांगला फायदा होईल - श्रीमंत संजीवराजे

BJP's Mitesh Kharade's entry into NCP in the presence of Shrimant Sanjeevaraje

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ मार्च  - भाजपाचे माजी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते काका उर्फ मितेश खराडे यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, महादेव माने, भाऊसाहेब कापसे,  फिरोज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

    मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांच्या प्रवेशावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काकासाहेब खराडे, बरेच दिवस संपर्कात होते, एक चांगला विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने आजचा त्यांचा प्रवेश आहे. त्यांच्या कार्याची पद्धत सर्वांना माहीत आहे. नगरपालिकेची निवडणूक त्यांनी लढवली होती, ती अत्यंत अटीतटीची निवडणूक झाली होती. एक चांगला कार्यकर्ता, सामाजिक काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. आणि अशा सामाजिक काम करणाऱ्या, लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करणाऱ्या काकासाहेब खराडे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व आमदार दीपकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे ठरवले आहे. त्यांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत करतो आणि एक चांगला विचार घेऊन फलटण शहरांमध्ये आणि तालुक्यामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीने, पक्षाला त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल असे मत  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

    मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि माजी पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथराजे व आमदार दिपकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. संयमी शांत व सुसंस्कृत अशा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे. मी सामाजिक राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना, अनेक आंदोलने केली. जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, इथून पुढेही श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली मी त्याच पद्धतीने काम करत राहीन आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन, आणि माझ्यावर जी जबाबदारी देतील, ती जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडेन असे मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी प्रवेशावेळी सांगितले. 

No comments