Breaking News

अपघातग्रस्तांना खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केली मदत

MP Ranjitsingh Naik Nimbalkar helped the accident victims

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ - पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण तालुक्यातील सुरवडी गावाजवळील जगताप वस्ती येथे दि.५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता स्विफ्ट गाडी व मोटरसायकल यांचा समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला.  याचदरम्यान माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीचा ताफा अपघात स्थळावरून जात असताना, खा.रणजितसिंह यांनी आपली गाडी थांबवून, अपघातग्रस्तांना जलद गतीने मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. रुग्णवाहिका बोलावून या अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून, या अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केला.

          या अपघातात आसू ता. फलटण येथील अमीन शेख, वय ४५ व समिना शेख, वय ४४ हे दुचाकी वरील दांपत्य जखमी झाले असून, त्यांना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने सुविधा हॉस्पिटल फलटण येथे दाखल करून खूप मदत केली. 

           यावेळी खासदार निंबाळकर यांना जगताप वस्तीवरील अमित जगताप, मयूर जगताप, चेतन जगताप, वैभव जगताप या स्थानिक तरुणांबरोबरच रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी ही खूप मदत केली.

No comments