Breaking News

आ.दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

MLA Deepak Chavan and Shrimant Sanjivraje Naik Nimbalkar performed Bhoomipujan of various development works

    फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ -   महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकङून वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत  फलटण नगरपरिषदेस २० कोटी रुपयांच्या   निधी आणि कामे  मंजूर करण्यात आली  आहेत. विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंतत्री अजितदादा पवार यांनी हा निधी आणि कामे  मंजूर केलेली  असून, फलटण शहरात मलठणसह विविध ठिकाणी  एकूण ३८ महत्त्वपूर्ण विकासकामे या निधी मुळे मार्गी लागणार आहेत. शहरात दोन ठिकाणी नवीन उंच पाण्याची टाकी,  रायझिंग लाईन,  ५० एचपी नवीन  मोटार , शहरातील महत्त्वाचे रस्ते, बंदिस्त गटार, कॉंक्रिटीकरण, लादीकरण, अंतर्गत रस्ते  आदी ३८ कामे मार्गी लागल्यावर ऐतिहासिक फलटण नगरीचे सौंदर्य आणि वैभव वाढून नागरिकांचे जीवन अजून सुखकर होणार  असल्याचे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

      फलटण शहरातील  विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार दिपकराव चव्हाण व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते.  यावेळी माजी  नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर , माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, सौ.वैशाली चोरामले, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी नगरसेवक अजय माळवे, खानविलकर, दादासाहेब चोरमले यांची उपस्थिती होती.       

    मंजूर झालेल्या निधीमधून पुढील कामे पुढील विकास कामे करण्यात येणार आहेत. १) कृषिराज कॉलनी येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे २) महतपुरा पेठ - शंभूराज कदम घर ते करणे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३) महतपुरा पेठ - साईबाबा मंदिर स्वागत कमान रोड ते बर्गे गॅरेज रस्ता करणे ४) महतपुरा पेठ -  उदय मांढरे घर ते प्रवीण घनवट घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 

    ५) प्रभाग क्रमांक १२ मुक्ती अंगण अपार्टमेंट ते एल बी कदम घर रस्ता करणे व संरक्षक भिंत बांधणे ६) प्रभाग क्रमांक १२ लक्ष्मी नगर नवीन सुविधा हॉस्पिटल येथे रस्ता करणे ७) प्रभाग क्रमांक १२ भोरी मज्जिद ते मुक्ती अंगण अपार्टमेंट ते एल बी कदम घरापर्यंत चार इंची पाण्याची वितरण नलिका बसवणे. ८) प्रभाग क्रमांक १२ सहारा साडी सेंटर ते निंबाळकर घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका बसवणे ९) हडको वसाहत अंतर्गत लादीकरण करणे १०) महाराजा मंगल कार्यालय परिसर कदम घर ते फिरोज बागवान प्लॉटपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 

११) प्रभाग क्रमांक १० दिलीप पवार घर ते नाथ मंदिर पाण्याची वितरण नलिका बसवणे १२) प्रभाग क्रमांक १० हनुमान नगर काळोखे वस्ती पाण्याची वितरण नलिका बसवणे  १३) प्रभाग क्रमांक १० अहिंसा मैदान लगतचा रस्ता सिमेंट काँक्रीट करणे १४) प्रभाग क्रमांक १० मंगलताई मठासमोर समोरील परिसर सिमेंट काँक्रीट करणे १५) प्रभाग क्रमांक १० डॉ. राजवैद्य ते बाजार घरासमोरील परिसर सिमेंट काँक्रीट करणे १६) प्रभाग क्रमांक १० सम्राट जनरल स्टोअर शेजारील परिसर सिमेंट काँक्रीट करणे १७) प्रभाग क्रमांक १० संत बापूतास नगर कमान करणे

१८)  प्रभाग क्रमांक ८ करणे घर ते खडकहिरा  ओढा पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 

१९) पद्मावती नगर स्वरा कॉर्नर ते शशिकांत थोरात घरापर्यंत तीन इंची व्यासाची पिण्याच्या पाण्याची वितरण नलिका बसवणे २०) पद्मावती अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 

२१) प्रभाग क्रमांक ६ शनिनगर बानगंगा नदी संरक्षक भिंत बांधणे २२) उमाजी नाईक चौक परिसर मेटकरी गल्ली परिसर पवार गल्ली परिसर पेविंग लादिकरण करणे तसेच गटरकरीता सिमेंट पाईप बसवणे 

२३) प्रभाग क्रमांक ९ अविनाश चोरमले घर ते समशेर शेख घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २४) प्रभाग क्रमांक ९ कोळपे घर ते रामदास निकम घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५) प्रभाग क्रमांक ९ कोळपे घर ते नेताजी चोरमले घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २६) प्रभाग क्रमांक ९ बेडके घर ते रामभाऊ जगताप घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २७) प्रभाग क्रमांक ९ अहिवळे घर ते फडतरे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट करणे २८) प्रभाग क्रमांक ९ शिवाजी रोड येथील अंतर्गत बोळे काँक्रिटीकरण करणे २९) प्रभाग क्रमांक ९ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिराच्या परिसरामध्ये पेविंग ब्लॉक बसवणे ३०) प्रभाग क्रमांक ९ अतुल कोठडीया ते मदने घर अंतर्गत बोळे काँक्रिटीकरण करणे ३१) प्रभाग क्रमांक ९ पवार घर ते मलानी घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ३२) प्रभाग क्रमांक ९ बर्गे घरचे जाधव घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ३३) प्रभाग क्रमांक ९ रवींद्र बेडकिहाळ घर ते कांबळे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट करणे

३४) गोळीबार मैदान येथे पाण्याची उंच टाकी बांधणे ३५) बारवबाग येथे पाण्याची उंच टाकी बांधणे ३६) सुधारित जलकेंद्र ते गिरवी नाका मेन रायझिंग ५० एचपी मोटर खरेदी करून बसवणे ३७) प्रभाग क्रमांक ६ ब्राह्मण गल्ली येथील डीपी शिप्ट करणे ३८) दत्त मंदिर ते नेहरू चौक ते कॉलेज रोड दत्त मंदिर रस्ता करणे.

No comments