Breaking News

दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल

Cases are filed against those who disturb public peace by drinking alcohol

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात फलटण शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री शहरात विविध ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यां चौघांच्या विरोधात वेगवेगळे गून्हे नोंद करण्यात आले आहेत.

    याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२९/०२/२०२४ रोजी पोलीस गस्त घालत असताना, फलटण शहर पोलीस ठाणेच्या हद्दीत खालील नमुद इसम दारू पिऊन  सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने, त्यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाणे येथे कलम ८५(१) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. 

    खालील व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १) गु.नों.क्र.  ११६/२०२४ - राहुल भगवान पवार, रा. हरिबुवा मंदिर शेजारी, मलठण, फलटण.  २) गु.नों.क्र.११७/२०२४ - श्रीराज जितेंद्र डोईफोडे रा. रविवार पेठ. फलटण. ३) गु.नों.क्र.११८/२०२४ - नितीन बाळू साळुंखे, वर ३८ वर्षे, रा. गडसोली मैदान, फलटण. ४) गु.नों.क्र.११९/२०२४- मयुर जयवंत कुंभार, वय ३२ वर्षे, रा. कुंभार गल्ली, रविवार पेठ, फलटण.

No comments