Breaking News

मुख्यमंत्री यांच्या हस्ते श्रीराम एज्युकेशन सोसायटीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्रदान

Chief Minister conferred Dr. Babasaheb Ambedkar Samaj Bhushan Award to Shri Ram Education Society

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यातर्फे दिला जाणारा २०२२- २०२३ सालचा संस्थेसाठी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण या संस्थेला मिळाला सून,  या संस्थेसाठी संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते आज पुरस्कार स्वीकारला.

   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यातर्फे दिला जाणारा २०२२-२३ सालचा संस्थेसाठी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी या संस्थेसाठी दि.७ मार्च २०२४ रोजी जाहीर झाला होता. आज दि. १२ मार्च रोजी पुरस्काराचे वितरण मुंबई येथे समारंभपुर्वक करण्यात आले. सदरचा पुरस्कार श्रीराम एज्युकेशन सोसायटी चे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी( बेडके) व संस्थेच्या संचालिका सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी(बेडके) यांनी स्वीकारला. सदरचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सचिन सूर्यवंशी (बेडके) यांचे अभिनंदन केले आहे.

No comments