दगडू माने यांचे दुःखद निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २७ - फलटण नगर परिषद शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक दगडू गुलाब माने यांचे दि.२५ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी, सून,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
दगडू गुलाब माने यांनी फलटण येथे नगर परिषदेच्या, शाळा क्र २, ३,४ वर शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली होती. त्यांचा स्वभाव शिस्तीचा, सरळमार्गी, मनमिळाऊ असा असल्याने त्यांचा मित्रपरिवार जास्त होता.
No comments