Breaking News

समविचारी नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार ; अफवांवर विश्वास ठेवू नये - श्रीमंत रामराजे

Decisions will be made only after discussing with like-minded leaders and workers; Rumors should not be believed - Rich Ramraje

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  - माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी निर्णय घेणार असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सांगितले असल्याचे, विधान परिषदेची माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या स्टेटस द्वारे जाहीर केले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही केले आहे.

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज दिनांक 19 मार्च 2024 रोजी आपल्या व्हाट्सअप स्टेटस द्वारे खालील प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार व माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माढा लोकसभा संदर्भात बैठकीत झाली, यामध्ये महायुतीचा धर्म पाळावा अशी मला सूचना करण्यात आली, परंतु मी माझे स्थानिक लेव्हलचे कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी निर्णय देईल असे सांगितले.

    माढा लोकसभाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माण-खटाव चे आमदार जयकुमार गोरे, सातारा जिल्हा परिषद मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण परिषदचे माजी नगरसेवक अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.

No comments