Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार रणजीतसिंह यांच्यामध्ये 'चर्चा'

'Discussion' between Deputy Chief Minister Ajit Pawar and MP Ranjit Singh

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५   - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असलेले खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने खासगीत चर्चा झाली, त्याचा तपशील देण्यास दोघांनीही नकार दिला.

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी फलटण येथे आले होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही आले. शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन करून झाल्यानंतर दोघांमध्ये राज्यातील साखर कारखानदाराच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यानंतर हळू आवाजामध्ये दोघांनी माढा लोकसभा मतदारसंघातील एकूण राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. या चर्चेचा तपशील जाहीर करण्यास दोघांनी पण नकार दिला, अजितदादा व रणजीतदादा हे दोन्ही दादा एकत्र आल्याने संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकच चर्चा रंगली होती.

No comments