Breaking News

दादासाहेब चोरमले यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार जाहीर

Dr. Babasaheb Ambedkar Samaj Bhushan Award announced to Dadasaheb Chormale

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते  मा.श्री.कृष्णाथ उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले यांना महाराष्ट्र शासनाचा व अतिशय महत्त्वपूर्ण असणारा भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार जाहीर झाला असून, मंगळवार दिनांक १२ रोजी नरिमन पॉईंट मुंबई येथे भव्य  समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना सन्मानित करण्यात येते, यामध्ये फलटण नगरीचे सुपुत्र मा.श्री.कृष्णाथ उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले यांना महाराष्ट्र शासनाचा "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण" पुरस्कार जाहीर झाला आहे. महात्मा शिक्षण  संस्थेचे  कार्याध्यक्ष असणारे दादासाहेब चोरमले हे गेली २५ वर्षे दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्यरत असून दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पुनर्वसनासाठी काम करीत आहेत. तसेच  विमुक्त जाती व भटक्या जमाती  आणि सामाजिक क्षेञात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार शासनाने जाहीर केलेला आहे. सध्या ते मुंजवङी येथील श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.  त्याना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध राजकिय , सामाजिक, शैक्षणिक आणि क्रिङा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments