Breaking News

दादासाहेब चोरमले यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

 ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दादासाहेब चोरमले व सौ.वैशाली चोरमले
Dr. Babasaheb Ambedkar Samajbhushan Award conferred on Dadasaheb Chormale

    फलटण  १२:  महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष कृष्णात ऊर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले यांना महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने मुंबई येथील सोहळ्यात क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजकल्याण विभागाचे सचिव डॉ. सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.

    महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. फलटण येथील कृष्णात ऊर्फ दादासाहेब चोरमले हे गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अंध, अपंग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण, त्यांची निवास व्यवस्था, त्यांना लघुउद्योगाचे शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची सन २०२०- २१ या वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. १५ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

No comments