Breaking News

डॉ. रविंद्र काळेबेरे यांना ग्रामिण भारतातील संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी पुरस्कार

Dr. Ravindra Kalebere Award for research and educational work in rural India

    फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) मुधोजी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे कार्यरत असणारे डॉ. रविंद्र  काळेबेरे यांना शैक्षणिक तसेच पिण्याचे पाणी व प्रदूषित पाणी यावर विशेष संशोधन केल्याबद्दल नवीदिल्ली  येथे मध्य प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री ओमकारसिंह मरकाम  यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    शक्ति मंत्रालय भारत सरकार मान्यता प्राप्त श्रेया एज्युकेशन फाऊंडेशन , नवी दिल्ली  यांच्या वतीने ग्रामिण भारतातील संशोधन व शैक्षणिक  क्षेत्रात उल्लेखनीय  काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करत देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो.

    सन २०२३-२४ मध्ये संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात प्रा. डॉ. रविंद्र काळेबेरे यांनी ग्रामिण तसेच शहरी भागातील एक मोठी समस्या असणाऱ्या पिण्याचे पाणी व प्रदूषित पाणी यावर उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण समारंभात मध्य प्रदेश चे माजी कॅबिनेट मंत्री ओमकार सिंह  मरकाम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी विकास दिव्य किर्ती , पद्मश्री विजेते अर्जुनसिंह ध्रुव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. काळेबेरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

No comments