Breaking News

माजी उनगराध्यक्षा सौ.रत्नमाला व माजी नगरसेवक भरत बेडके यांचा भाजपात प्रवेश ; भविष्यात अनेकांचे प्रवेश होताना दिसतील - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Former vice president  Ratnamala and former corporator Bharat Bedke joined BJP

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - फलटण नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा सौ. रत्नमाला भरत बेडके, माजी नगरसेवक भरत दत्ताजीराव बेडके व त्यांचे चिरंजीव अजिंक्य भरत बेडके यांचा आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला.

 फलटण नगरपालिकेमध्ये सौ. रत्नमाला भरत बेडके यांनी उपनगराध्यक्षापदी व भरत दत्ताजीराव बेडके यांनी नगरसेवकपदी दहा वर्ष   काम पाहिले आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे  खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व  समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची फलटण शहरामध्ये मोठी राजकीय ताकद वाढली आहे. भविष्यात श्री. भरत बेडके यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल आणि याच पद्धतीने भविष्यात अनेक मान्यवरांचे भाजपामध्ये प्रवेश होताना दिसतील असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले. 

     भाजपामध्ये पक्षप्रवेशाचे कारण सांगताना भरत बेडके म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांना भेटलेल्या खासदार पदाचा फायदा त्यांनी फक्त सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त होईल असाच केला. त्यांनी अनेक वर्ष रखडलेले शहरातील व तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. फलटण शहरातील अनेक समस्या सोडण्यासाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच फलटण तालुक्याला लागलेला दुष्काळी हा कलंक पुसण्यासाठी त्यांनी निरा-देवधर प्रकल्प मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. धोम-बलकवडी कालवा चारमाही वरून बारमाही केला. फलटण-लोणंद, फलटण-बारामती, फलटण-पंढरपूर रेल्वे मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. फलटण शहरात व तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. इतकेच नाही तर त्यांनी फलटण साठी आरटीओ ऑफिस ची मंजुरी घेऊन फलटणची वेगळी ओळख निर्माण केली. फलटण साठी जिल्हा न्यायालय मंजूर केले, तरुणांसाठी दुसरी नवीन एमआयडीसी मंजूर केली असे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यामुळे मी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मा. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

         खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मा. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर व तालुक्याचा येणाऱ्या काळात अतिशय चांगला व नियोजनबद्ध विकास होईल असा मला विश्वास आहे. त्यामुळे खासदार साहेब भविष्यात जी जबाबदारी मला देतील ती जबाबदारी मी अतिशय मनापासून पार पाडेन व फलटण शहरामध्ये भाजपाची ताकद वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. अशी इच्छा भरत बेडके यांनी बोलताना व्यक्त केली.

        पक्षप्रवेशावेळी भाजपा फलटण शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वसीमभाई मणेर सावकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments