Breaking News

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून कै. सुभाषराव शिंदे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

From Deputy Chief Minister Ajitdada Pawar. Condolences to the family of Subhash Rao Shinde

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५  -  फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे उर्फ भाऊ यांच्या दुःखद निधनानंतर, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुभाषराव शिंदे यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

    ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे दि.१३ मार्च रोजी दुःखद निधन झाले होते. खासदार शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक होते, पवार कुटुंबीयांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कै.सुभाषराव शिंदे यांच्या घरी येऊन, त्यांचे सुपुत्र चेतन शिंदे व इतर कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि सुभाषराव शिंदे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आ. दत्तात्रय भरणे, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले आदी उपस्थित होते.

No comments