Breaking News

माजीउपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून कै. सुभाषराव शिंदे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

From former Deputy Chief Minister Vijay Singh Mohite Patil. Condolences to the family of Subhash Rao Shinde

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ -  ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे उर्फ भाऊ यांच्या दुःखद निधनानंतर, माजीउपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुभाषराव शिंदे यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

    ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे दि.१३ मार्च रोजी दुःखद निधन झाले होते. सुभाषराव शिंदे यांचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चांगले   संबंध होते. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांनी कै.सुभाषराव शिंदे यांच्या घरी येऊन, त्यांचे सुपुत्र चेतन शिंदे व कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. यावेळी उद्योजक विजय कदम, नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.

No comments